ताडोबामध्ये 5 वाघांची ‘हॅपी फॅमिली’

March 19, 2012 1:28 PM0 commentsViews: 34

19 मार्च

वाघ बघण्याची इच्छा सर्वांनाच असते. पण बरेचदा जंगलात तासंतास फेरफटका मारूनही वाघाचं दर्शन होत नाही. पण नुकताच उन्हाळा सुरू झाला आणि ताडोबाच्या जंगलात पर्यटकांची संख्या ही वाढू लागलीय. त्यातच सध्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक नाही दोन नाही तर चक्क पाच वाघांचं कुटुंब पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. वाघांचं हे कुटुंब मनसोक्त भटकतांना दिसतंय.

close