निसर्गाची थट्टा, चिमुरड्याला चार पाय, दोन लिंग !

March 19, 2012 2:54 PM0 commentsViews: 112

मनोज जैस्वाल, वाशिम

19 मार्च

निसर्ग कुणाच्या बाबतीत कुठला खेळ मांडेल ते सांगता येत नाही. वाशिम जिल्हातल्या मन्वर कुटुंबाला याचाच सध्या अनुभव येतोय. मुल झाल्याचं सुख भरभरून घेण्याऐवजी, त्यांच्या पुढच्या आयुष्यात काय होणार याचं चिंतेनं त्यांना घासही गोड लागत नाही. या शेतमजूर कुटुंबाची ही व्यथा मांडलीय.

वाशिममधल्या पारव्यातलं रवींद्र मनवरांंचं घर सध्या या गोंडस अशा राजच्या बाळलीलांनी गजबजलंय. पण…. त्याला एक दुखाची झालरही आहे.जन्मत:च या चिमुरड्याला दोन लिंग आणि चार पाय आहेत. निसर्गाच्या या क्रूर खेळामुळे रवींद्र आणि त्याचे कुटुंबीय चिंतेत सापडले आहे.

रवींद्र शेत मजूर आहे. त्यामुळे घरची परिस्थितीही बेताचीच. पुढचा धोका टाळण्यासाठी राजवर तातडीनं शस्त्रक्रीया केली. तरच त्याचा जीव वाचणार आहे. पण जिथं रोजच्या खाण्याची मारामार, तिथं हा शस्त्रक्रियेचा 3 लाख रुपयांचा खर्च मन्वर कुटुंबाला कसा झेपणार ? त्यामुळे या चिमुरड्या बालकाच तसे हाल होत आहे. मन्वर कुटुंबीयांना एकीकडे मुलं झाल्याचा आनंद आहेच पण नियतीच्या या विचित्र खेळामुळे ते पुरते हतबल झाले आहेत. 9 महिन्यांचा हा पोटचा गोळा वाचवण्यासाठी त्यांची पराकाष्टा चालली. समाजानंही हातभार लावावा अशीच त्यांची अपेक्षा आहे.

close