अंधांना जगाची ओळख पाक्षिकाच्या ‘नजरे’तून

March 20, 2012 12:43 PM0 commentsViews: 43

20 मार्च

सकाळी वृत्तपत्र न वाचता सर्वसामान्याचा दिवस कधी सुरु होतंच नाही. वृत्तपत्राच्या माध्यमातून जगाची माहिती आपल्याला मिळते. पण अंधांना यासाठी वृत्तवाहिनी किंवा रेडिओचा आसरा घ्यावा लागतो. यावर मात करत रिलायन्स फाऊंडेशनच्या दृष्टी फाऊंडेशन आणि नॅब या दृष्टीहिनांसाठी काम करणार्‍या संस्थांनी मिळून भारतातील पहिल ब्रेल लिपितले 'रिलायन्स दृष्टी' हिन्दी भाषिक पाक्षिक सुरु केलं आहे. काल दादर येथील कमला मेहता अंधशाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात रिलायन्स दृष्टीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी रिलायन्सच्या फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी,नॅशनल असोसियशन फॉर द ब्लाईंडचे सरचिटणीस के.रामकृष्णन,सचिव दिनू गांधी, कमला मेहता शाळेचे सचिव हरेश मेहता आणि 'रिलायन्स दृष्टी'चे मुख्य संपादक स्वागत थोरात यांच्यासह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

close