विजयदिनानिमित्त कराडमध्ये सैनिकी कवायतींच आयोजन

December 16, 2008 2:37 PM0 commentsViews: 5

16 डिसेंबर कराडप्रताप नाईकबांगलादेश युद्धात भारतीय नौदलानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्या युद्धात अनेक सैनिक धारातीर्थी पडले. त्या शूरांच्या आठवणी जागवण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या कराड इथे विजयदिवस साजरा केला गेला. यानिमित्तानं कराडमध्ये नौदल, लष्कर आणि हवाईदलाच्या कवायतींची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. कराड नगरपरिषदेच्या मैदानात ही प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. विजयदिवसाच्या निमित्ताने सैनिक दलातील शस्त्र-सामुग्री, लढाई दरम्यानचे तसेच शहीद जवानांच्या फोटोच्या प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला शाळेतील मुलांनी तसेच नागरिकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला.लष्काराच्या प्रात्यक्षिकामध्ये शस्त्रधारी सैन्याच्या कसरती, मल्लखांब, मार्शल आर्ट तसेच एअर शोचं आयोजन करण्यात आलं. ही प्रात्यक्षिक दाखवण्यामागे तरुणांना आकर्षित करून त्यांनी भारतीय सैन्यात दाखलं व्हावं हा उद्देश आहे.

close