महाशतकवीर घरी परतला

March 21, 2012 12:21 PM0 commentsViews: 2

21 मार्च

आशिया कप स्पर्धेत बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला आणि भारतीय टीमचं फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल. भारतीय टीम आज मायदेशी परतली आहे. आणि महाशतकवीर सचिन तेंडुलकरचे आज मुंबई विमानतळावर आगमन झालं. त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. विमानतळावरुन ते वांद्रे येथील सचिनच्या घरापर्यंत सचिनचे चाहत्ये सचिनच्या सोबत होते. त्यांच्या बंगल्याबाहेरही चाहत्यांनी गर्दी केली होती. तर महाशतकासाठी बरीच वाट पहावी लागल्याची प्रतिक्रिया सचिननं यावेळी दिली.

close