पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शहीद अशोक कामटेंना श्रद्धांजली

December 16, 2008 3:16 PM0 commentsViews: 86

16 डिसेंबर मुंबईसमीर सावंतमुंबईत अनेक राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा झाल्या. पण यंदाची पॉवरलिफ्टींग स्पर्धा काहीशी वेगळी होती. या स्पर्धेतील विजेत्यांनी आपलं यश हे मुंबईवरील हल्यात शहीद झालेले अशोक कामटे यांना समर्पित केलं आहे. कामटे हे स्वत: राष्ट्रीय पॉवरलिफ्टर होते.26 नोव्हेंबर 2008 मुंबईसाठी एक काळरात्र ठरली. दहशतवादी हल्ल्यानं मुंबई हादरून गेली. दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यात सर्वात आघाडीवर होते ते मुंबई पोलीस. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना हेमंत करकरे, विजय साळसकरांबरोबर अशोक कामटेही शहीद झाले. कॉलेज जीवनात कामटेंना पॉवरलिफ्टिंगची विशेष आवड होती. त्यांनी अनेक स्पर्धाही गाजवल्या होत्या. राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने अशोक कामटेच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. अजूनही अशोक कामटेंच्या आठवणी त्यांच्या पॉवरलिफ्टर सहका-यांना व्यथित करतात.

close