विहिरीत पडलेल्या वळूची सुखरुप सुटका

March 23, 2012 4:47 PM0 commentsViews: 7

23 मार्च

वाशिममध्ये खोल विहिरीत पडलेल्या वळूला तब्बल 17 तासानंतर बाहेर काढलं. शहरातील इंगोले नगरमध्ये काल मध्यरात्री दोन वळूंमध्ये टक्कर झाली. यानंतर हा वळू 50 फूट खोल विहिरीत पडला. परिसरातील नागरिकांनी रात्री या वळूला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले खरे मात्र त्यात यश मिळालं नाही. अखेर वाशिम नगरपरिषदेला याची माहिती देण्यात आली. नगर परिषदेच्या टीमने वळूला दोराने बांधून ट्रक्टरच्या साह्याने बाहेर काढलं. या दरम्यान बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

close