शाहीद आफ्रिदीने केली चाहत्यांना मारहाण

March 24, 2012 11:49 AM0 commentsViews: 10

24 मार्च

आशिया कप मालिका जिंकून मायदेशी परतलेल्या पाकिस्तानचा धडाकेबाज बॅट्समन शाहीद आफ्रिदीने आपल्याच चाहत्यांना मारहाण केली आहे.कराची एअरपोर्टवर आफ्रिदीने आपल्या फॅन्सला मारहाण केली. आफ्रिदीचे हे फॅन्स त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी केली. आपल्या लाडक्या क्रिकेटरला जवळून पाहण्याची संधी मिळाल्यामुळे चाहत्यांनी शाहिदला गरडा घातला. परिणामी संतापलेल्या शाहिदने थेट चाहत्यांवरच हल्ला चढवला. लाथा-बुक्याने मारहाण केली. त्याचं हे रुप पाहुन चाहतेही अवाक् झाले. पण आपल्या मुलीला धक्का दिल्यामुळे आपण त्यांना मारल्याचं शाहीदनं म्हटलं आहे.

close