घड्याळाचं चिन्ह बदलून खंजीर करुन घ्या – कदम

March 24, 2012 3:06 PM0 commentsViews: 6

24 मार्च

राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्ष उरलेला नाही, हे त्यांनी सिद्ध केलंय असा आरोप विश्वजित कदम यांनी केला. राष्ट्रवादीनं आता त्यांचं घड्याळाचं चिन्ह बदलून खंजीर करुन घ्यावं असा उपरोधिक सल्लाही त्यांनी राष्ट्रवादीला दिला. यापूर्वी त्यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, अशी टीकाही कदम यांनी केली. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने घेतलेल्या भुमिकेवर विश्वजित कदम यांनी ही टीका केली.

close