मलाही दरवाढ नको होती – अजित पवार

March 26, 2012 4:18 PM0 commentsViews: 6

26 मार्च

घरघुती गॅस दरवाढीचा घेतलेला निर्णय मलाही नको होता. पण राज्याचा आर्थिक गाडा सुधारण्यासाठी परिस्थितीमुळे हा निर्णय घावा लागल्याचं अजित पवार यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं. आज सगळ्यांना विकास हवा आहे. तर दुसरीकडे राज्यावर कर्जाचा हप्ताही फेडायचा आहे मग हे कसे शक्य होणार आहे ? गॅसवर राज्यात कोणताही कर नाही. फक्त मुंबईत पाईपलाईनव्दारे येणार्‍या गॅसवर 12.5 टक्के कर आहे पण उद्या सगळीकडे हाच पर्याय वापराला जाईल पण गॅसवर केलेली 5 टक्के वाढ योग्य आहे. राज्यात गॅस वापरणा वर्ग हा उच्च,मध्यम आणि फार कमी प्रमाणात गरीब येतो त्यातच गरीब आणि सर्वसामान्य जनता केरीसनचा वापर जास्त करतो आणि केरोसिनवर कोणताही कर नाही. त्यामुळे लोकशाहीमध्ये असली भाववाढ होत असते. या अगोदरपण एनडीएचे सरकार होते तेंव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किमंती वाढल्या तर देशात वाढवल्या आहे त्यामुळे उद्या नागरिक ही भाव वाढ समजून घेतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

close