विरोधी पक्षांनी केली विधानभवनाबाहेर निदर्शनं

December 16, 2008 2:15 PM0 commentsViews: 1

16 डिसेंबर नागपूरविधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाबाहेर निदर्शनं केली. मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात ही निदर्शनं होती. अतिरेकी हल्ल्याच्या निषेधाचे फलक अंगावर लावून आमदार आले होते. यात सीपीएमचे नरसय्या आडाम , भाजपचे आमदार गोपाळ शेट्टी , सरदार तारासिंग आणि राज पुरोहित यांचा समावेश होता. या आमदारांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दहशतवादावर स्थगन प्रस्तावाद्वारेच चर्चा व्हावी या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विरोधक आमदारांनी हे अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं होतं.दरम्यान अधिवेशनाच्या दुस-याच दिवशी विधीमंडळावर अकरा वेगवेगळे मोर्चे धडकले. यात सिंधी समाज, कायस्थ चर्मकार संघ, मातंग समाज, अखिल भारतीय धम्म परिषद या मुख्य मोर्चांचा समावेश होता.

close