देशासाठी खेळणं स्वप्न होतं – द्रविड

March 27, 2012 5:39 PM0 commentsViews: 7

27 मार्च

भारतीय क्रिकेटर 'द वॉल' राहुल द्रविडचा आज बीसीसीआयने विशेष सत्कार केला. दोन आठवड्यांपुर्वीच राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाकरता द्रविडचा सत्कार आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला भारतीय टीममधील आजी, माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते. सचिन तेंडुलकर सहकुटुंब लंडनमध्ये असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. द्रविडचं टीममधील स्थान किती महत्वाचं होतं, हे यावेळी भारतीय टीममधल्या त्याच्या सहकार्‍यांनी सांगतिलं. तर देशासाठी खेळणं हे आपलं स्वप्न होतं, आणि क्रिकेटनं आपल्याला जीवनाचे अनुभव दिले अशी भावना द्रविडनं यावेळी व्यक्त केली.

close