सभागृहातच सेना-काँग्रेसच्या सदस्यांमध्ये हाणामारी

April 2, 2012 5:36 PM0 commentsViews: 8

02 एप्रिल

जिल्हा परिषदेत आज शिवसेना आणि काँग्रेस सदस्यांनी भर सभागृहातच हाणामारी केल्याची घटना घडली आहे. भाजप सदस्यांनी काँग्रेस सदस्याला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे सदस्य संतप्त झाले होते. शाब्दीक वादाचं रुपांतर हाणामारीत झाल्याने अखेर सभागृहात पोलिसांना पाचारण करावं लागलं होतं. 59 सदस्य असलेल्या अमरावती जिल्हा परीषदेत काँग्रेसचे सर्वाधिक 25 सदस्य असतानाही ऐन वेळी राष्ट्रवादीने काँग्रेसला दगा दिल्याने काँग्रेसला अध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं होतं. म्हणूनंच आजच्या विषय समिती निवडणुकीत काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला होता.भाजपचे 2 आणि प्रहारच्या 5 सदस्यांशी काँग्रेसनं हातमिळवणी केली. आणि याच मुद्यावरुन सेना सदस्यांनी सभागृहात भाजप सदस्य मनोहर सुने आणि सुनील विखे यांच्याशी वाद घातले.त्यांनासमर्थनासाठी पुढे आलेल्या काँग्रेस सदस्यांशी सेना सदस्यांनी चांगलाच वाद घातला. अखेर पाहता पाहता दोन्ही गटांमधे हाणामारी सुरु झाली. या गदारोळातच ही निवडणूक प्रक्रीया सुरु झाली आणी चारही विषय समिती सभापतीपद काँग्रेसनं पटकावलं.

close