‘शुभमच्या मारेकर्‍यांना फाशी द्या’

April 2, 2012 5:28 PM0 commentsViews: 6

02 एप्रिल

काल शुभम शिर्केच्या हत्येनं पुणं शहर हादरून गेलं. पन्नास हजार रुपयांसाठी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांनी शुभमचं अपहरण करुन त्याचा खून केला. या प्रकरणी या तिघांनाही अटक करण्यात आलीय. टीव्ही वरील सिरियल पाहून आपण हे कृत्य केल्याचं या मुलांनी पोलिसांना सांगितलंय.

हा टोहो आहे एका आईचा… पुण्यात शनिवारी हत्या झालेल्या 15 वर्षांच्या शुभम शिर्केच्या आई- वडीलांना हवाय न्याय. दहावीत शिकणार्‍या शुभमचा त्याच्या मित्रांनीच 50 हजार रुपयांसाठी खून केला. शुभमच्या हत्येनंतर आरोपींनी दिलेला कबुलीजबाब अत्यंत धक्कादायक आहे. खून केल्यानंतर.. त्यांनी शुभच्या वडिलांकडून खंडणीचे पैसेही वसूल केले. हे आरोपी अल्पवयीन असले. तरी त्यांना फाशी द्या, अशी मागणी आता शुभमच्या पालकांनी केली.

शुभमचा खून करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी दोन अल्पवयीन असल्याने त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. मध्यमवर्गीय मुलांनी आपल्याच वर्गमित्राची हत्या केली. खंडणी वसूल केली.. आणि नंतर सराईत गुन्हेगाराप्रमाणे शांतपणे घरी गेले. शाळेतल्या मुलांच्या या निर्ढावलेपणानं अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतं आहे.

close