नक्षलवादाच्या बुरख्याआड

April 3, 2012 3:24 PM0 commentsViews: 26

गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादाची चळवळ रुजली त्याला आता 30 वर्ष झाली. सुरवातीच्या काळामध्ये गावकरीच नक्षलवादाला पाठिंबा देतात असं सांगितलं जायचं. पण मधल्या काळात परिस्थिती बरीच बदलली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 पैकी 8 तालुके हे नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित झाले. आदिवासी नक्षलवाद्यांना आश्रय देतात, असा गैरसमज प्रचलित आहे. पण प्रत्यक्षात, नक्षलवाद्यांना सहकार्य केलं नाही किंवा नक्षलवाद्यांविरोधात कोणतीही कृती केल्याचा साधा संशय जरी आला तरी गरीब आदिवासीला ठार मारण्याची क्रूर मोहीम नक्षलवाद्यांनी हाती घेतलीय. गडचिरोलीची अशी अवस्था का झाली ? याच बदलेल्या परिस्थितीचा आढावा घेणारा हा रिपोर्ताज…नक्षलवादाच्या बुरख्याआड

close