अबब्…108 फुटांची पिशवी !

April 5, 2012 12:53 PM0 commentsViews: 9

05 एप्रिल

महावीर जयंतीनिमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी नाशिकमध्ये 108 फुटांची कापडी पिशवी बनवण्यात आली आहे. नाशिकच्या जैन सोशल ग्रुपतर्फे बनवण्यात आलेल्या या पिशवीची नोंद लिमका गिनीज रेकॉर्डमध्ये झाली आहे. कॅरीबॅगऐवजी कापडी पिशव्या वापराव्यात हा संदेश देण्यासाठी ही पिशवी तयार करण्यात आली. 108 फूट रुंदीची आणि 53 फूट लांबींची ही पिशवी मेहेर सिग्नलजवळच्या इमारतीवर तिचं अनावरण करण्यात आलं. यासाठी 35 हजार किलोमीटरचा धागा आणि 150 किलो रंग वापरण्यात आले आहेत.

close