चला, जग जिंकूया.!!

April 6, 2012 2:37 PM0 commentsViews: 14

06 एप्रिल

आयबीएन- लोकमतला आज चार वर्षं पूर्ण होताय. निर्भीड पत्रकारितेचा वसा जपत आयबीएन लोकमतने प्रेक्षकांंची मनंं जिंकली आहेत. 6 एप्रिल 2008 मराठी पत्रकारीतेच्या इतिहासात एक नवं पर्व सुरु झालं. आयबीएन-लोकमत …चला जग जिंकूयाचा नारा देत…रिजनल चॅनलच्या भिंतीं मोडत आयबीएन-लोकमतने आपली वाटचाल सुरू केली. अचूक बातमी देताना विश्वासर्हता जपली. आणि घडामोडींवर ठाम मतंही दिलं. राजकारण ते समाजकारण आणि क्रिकेट ते बॉलिवूड प्रत्येक बातमी…अचूक आणि ठाम..लोकसभा निवडणूक असो की महापालिकांचा महासंग्राम आयबीएन-लोकमतने दिले अचूक अंदाज…निवडणुकीचे परिपूर्ण कव्हरेज देत आयबीएन-लोकमत ठरलं नंबर 1.

मुख्यमंत्री बदलाची नांदी. आणि कोण होणार नवा मुख्यमंत्री पहिली बातमी दिली आयबीएन-लोकमतने..बजेट…बजेटचे परिणाम तज्ज्ञांची मतं, अर्थमंत्र्यांचं किचकट बजट आम आदमीला समजेल उमजेल अशा सोप्या भाषेत सांगितलं आणि बजेटमध्येही ठरलो नंबर 1. बातम्या देत्याना आम्ही जपली सामाजिक बांधीलकीही..समाजाच्या वाईट रुढींवर चढवला घणाघाती हल्ला. आपल्या जगण्याने समाजाच्या जगण्यात बदल घडवणार्‍या…भर टाकणार्‍या..दिग्गजांची तुमच्याशी भेट घडवली. ग्रेट भेटमधून. राजकारण, समाजकारण किंवा अर्थकारण असेल, यातल्या प्रत्येक बातमीमागील बातमी तुमच्यापर्यंत आम्ही पोहचवला.आमच्या या प्रयत्नांवर पुरस्काराची मोहरही उमटली. आतापर्यंत चारवर्षांची यशस्वी वाटचाल आम्ही केली ती तुमच्या पाठबळाच्या जोरावर.पाचव्या वर्षात आम्ही पाऊल टाकतोय ते तुम्हा प्रेक्षकांच्या प्रतिसाद आणि पाठिंब्याच्या जोरावरचं…चला जग जिंकूया….

close