विठ्ठलाचं मुखदर्शन आता अगदी जवळून

December 16, 2008 2:07 PM0 commentsViews: 2

16 डिसेंबर पंढरपूरपंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या मुखदर्शनाची सोय आता अधिक जवळून क रण्यात आली आहे. मुखदर्शनाच्या रांगेतून आलेल्या भाविकांना या आधी विठ्ठलाचं डोळे भरून दर्शन घेता यायचं नाही . भाविकांच्या मागणीनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीने मुखदर्शनाची रांग आता थेट देवाच्या गाभा-याजवळ आणली आहे. त्यामुळे विठ्ठलमूर्तीचं आता चांगलं दर्शन घेता येईल. पंढरीच्या दर्शनात पहिला मान पदस्पर्श दर्शनाला मिळतो, ते झालं नाही तर मुखदर्शन आणि मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन वारी करण्याची परंपरा आहे. पण गैरसोयी वाढल्यानं भाविकांमधून रोष व्यक्त होत होता. यासंबधीची बातमी आयबीएन-लोकमतने उचलून धरली होती. आता मुखदर्शनाच्या रांगेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे भाविकामधून आनंद व्यक्त होत आहे.

close