आणखी किती लेकींचा बळी ?

April 9, 2012 5:27 PM0 commentsViews: 6

09 एप्रिल

ऑनर किलिंगची ही राज्यातली दुसरी घटना. यावर विधिमंडळातही चर्चा झाली. यावर समाजानंच बदलण्याची गरज असल्याची मतं व्यक्त होत आहेत.ऑनर किलिंग…महाराष्ट्राच्या माथी लागू पाहत असलेला नवा कलंक…पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारसरणीला काळीमा फासणार्‍या घटना..आधी सातारा… आता जळगाव जिल्ह्यातली पाथरी..मुलीनं केलेल्या प्रेमाला समाजमान्यता नसल्याने अशा दुदैर्वी घटना घडताहेत…याविषयावर अजूनही जनजागृती होण्याची आवश्यकता आहे, असं सामाजिक कार्यकर्त्यांना वाटतंय.

पाथरीच्या या घटनेचे पडसाद विधीमंडळातही उमटले. याला केवळ सत्ताधार्‍यांना दोष देत देण्यात अर्थ नाही, तर समाजमनावर बसलेली जळमटं झटकण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे असं विरोधी पक्षांना वाटतंय.

समाजाची मानसिकता बदलत नाही, तोवर समाजात अशाच घटना घडत राहतील, अशी भीती समाजशास्त्रज्ञांना वाटतेय. त्यामुळे समाजाने आता बुरसटलेल्या विचारसरणीतून बाहेर येऊन, तरुण पिढीला नवे विचार देण्याची हीच वेळ आहे.

close