सुनामी आली तर…?

April 11, 2012 12:39 PM0 commentsViews: 60

11 एप्रिल

इंडोनेशियात भूकंपाचे धक्के बसले आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 8.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. तर आता 8.2 रिश्टर स्केलचे आफ्टर शॉकही सध्या इंडोनेशियात बसले आहेत. गेल्या 100 वर्षांतला हा आठवा सर्वांत मोठा भूकंप आहे. पण अजून कोणत्याही जिवीत हानीची बातमी नाही. इंडोनेशियातल्या भूकंपानंतर 28 देशांमध्ये सुनामीच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह देशातल्या अनेक शहरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भारताला कुठे कुठे भूकंपाचे धक्के बसलेत. यापूर्वीही इंडोनेशियात आलेल्या भूकंपामुळे जी सुनामी आली होती. त्याचा फटका अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश,तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यांना बसला आहे. जर सुनामी आली तर या भागांना धक्का पोहचण्याची शक्यता आहे.

close