शाहू महाराजांच्या वास्तूची दुरावस्था

December 16, 2008 5:16 PM0 commentsViews: 15

16 डिसेंबर, कोल्हापूरसिटीझन जर्नलिस्ट अमित आडसुळे छत्रपती शाहु महाराजांची नगरी म्हणजे कोल्हापूर. मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणार्‍या या करवीर नगरीत आज मात्र अनेक ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष होतंय. नेतेमंडळी शाहू महाराजांचं नाव घेत फिरतात. पण खुद्द छत्रपतींच्याच वास्तूची आज दुरावस्था होत चाललीये. त्याकडे मात्र कुणाचंच लक्ष नाहीये. छत्रपती शाहू महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या ' लक्ष्मी विलास ' वास्तूची दुरावस्था झाली आहे. शासनानं वास्तूच्या सुशोभीकरणाचा आराखडा केला आहे पण निधीअभावी आराखडा कागदावरच आहे. मात्र याबाबत शासनाची उदासिनता दिसून येत आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि रणरागिनी ताराबाई यांची मंदिरंही दुलक्षिर्त आहे. या ऐतिहासिक वास्तूंचं जतन न केल्यास या वास्तू इतिहासजमा होतील.

close