अजितदादांच्याच सभेत वीज गुल

April 12, 2012 10:52 AM0 commentsViews: 15

12 एप्रिल

डिसेंबर 2012 पर्यंत महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त करण्याचे आश्वासन देणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवाराच्या सभेत तब्बत अर्धा तास वीज गेली. परभणी महापालिकेची 15 तारखेला निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांची सभा सुरू होताच वीज गेली. वीज जाताच धावपळ उडाली कार्यकर्त्यांची आणि पालकमंत्री प्रकाश सोळंके यांची. तोपर्यंत अजितदादा टॉर्चच्या प्रकाशात दादा कागदावरचे मुद्दे वाचत बसले. पालकमंत्र्यांनी अंधारातच भाषण करत प्रगतीचे पाढे वाचले. शेवटी अर्ध्यातासाने वीज आली आणि अजितदादांनी भाषण सुरू केलं. त्यात शहराच्या प्रगतीचं आश्वासन दिलं. मात्र लोडशेडींगचा मुद्याचा उल्लेखही केला नाही. शेवटी घरी जातांना लोकांमध्ये चर्चा होती ती दादांच्या भाषणाची नाही तर सभेत वीज जाण्याची…

close