बाजार कोवळ्या फुलांचा !

April 13, 2012 5:55 PM0 commentsViews: 32

13 एप्रिल

देशात तान्ही बाळं विक्रीचा व्यवसायही जोरात सुरु आहे. सीएनएन आयबीएन आणि कोबरा पोस्ट यांनी एका स्टिंग ऑपरेशनकरुन हा सर्व धक्कादायक प्रकार उघड केलाय. उत्तर प्रदेशातल्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये हा बाळ खरेदी-विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरु आहे.

सरकारी हॉस्पिटल्स गरीबांसाठी सर्वात सुरक्षित आणि सोयीचं समजलं जातं. पण उत्तर प्रदेशातल्या आमरोहमधलं हे सरकारी हॉस्पिटल त्याला अपवाद आहे. या हॉस्पिटलमध्ये तान्ह्या बाळांची खरेदी-विक्री चालते. काही हजार रुपयांसाठी इथे गरीबांची मुलं विकली जातात. आमच्या अंडरकव्हर प्रतिनिधीशी हॉस्पिटलची नर्स दया पिटरने बातचीत केली.

बाजार कोवळ्या फुलांचा

नर्स दया पिटर – तुम्हाला मुलगा हवा की मुलगीरिपोर्टर – कुणीही चालेल. पण मुलगा असेल तर चांगलं. गोरा हवा.नर्स दया पिटर – तुम्ही 3 महिन्यांपूर्वी भेटायला हवं होतंरिपोर्टर – का?नर्स दया पिटर – मी 3 मुली आणि 1 मुलगा दिलारिपोर्टर – बरं…नर्स दया पिटर – सुंदर मुलगी होती. जाट जोडप्याची होती. 4 किलो वजन होतंइथली नर्स ज्या बाळाला विकायचं असतं त्याला रात्री घरी घेऊन जाते आणि दुसर्‍या दिवशी त्याला विकते.नर्स दया पिटर – पण हे कुणाला सांगू नकारिपोर्टर – नाही, कुणालाच नाहीनर्स दया पिटर – नाहीतर त्रास होईलरिपोर्टर – मी मुलालाही सांगणार नाहीनर्स दया पिटर – आम्ही खूप स्वस्तात देतो. खासगी हॉस्पिटलमध्ये खूप भाव आहेपण या धंद्यात दया एकटी नाही. हॉस्पिटलमधली किरण नावाची आयासुद्धा यात सहभागी आहे.

रिपोर्टर – याआधी तुम्ही किती पैसे घेतलेत. मला जरा सांगा… मलाही पैशांचा बंदोबस्त करावा लागेल.किरण – खूप पैसे लागणार नाहीत. गरीबांच मुलं असेल. श्रीमंत आपलं मुल कशाला विकतीलरिपोर्टर – ठिक आहे. मला दहा, पंधरा हजार जास्त आणावे लागतील का?किरण – ते बरंच होईल

एवढंच नाही तर हॉस्पिटलच्या डॉक्टरही यात सहभागी आहेत.

रिपोर्टर – मला गोरं बाळ पाहिजे.. माझ्या कुटुंबात सर्वच गोरे आहेतडॉक्टर – बरोबर आहे… प्रत्येकालाच आपल्या कुटुंबातल्या लोकांसारखं दिसणारंच बाळ हवं असतं.रिपोर्टर – तुमच्याकडे माझा नंबर आहे ना… डॉक्टर – काळजी करु नका… कुणाला मुली नको असतात. अशावेळी ते मुली विकतात

बाळाच्या खरेदीबद्दल सर्व चर्चा झाल्यानंतर आता वेळ होती बाळाला विकत घेण्याची. यासाठी आया किरणनं आमच्या अंडरकव्हर रिपोर्टरला फोन केला. एका जोडप्याला 6 मुलं आहेत. त्यांना पैसे हवेत. त्यासाठी ते आपला एक मुलगा विकायला तयार असल्याचं तिनं सांगितलं. 60 हजारात ती ते मुल द्यायला तयार असल्याचं तिनं सांगितलं. वडील – मी खूप गरीब आहे. किरणजींनी मला हे सुचवलं. या पैशांनी मी माझ्या इतर मुलांचं भविष्य सुरक्षित करु शकतोहॉस्पिटलमध्ये आया म्हणून काम करणारी किरण घरी मात्र हा मुलं विक्रीचा व्यवसाय करते. तिच्या घरी गेल्यावर तिच्या नवर्‍यानं किंमत वाढवण्याचा प्रयत्न केला.

रिपोर्टर – मला किती पैसे द्यावे लागतील?गजेंद्र – तुम्ही जेवढ्यात सौदा केला असेल त्यात माझा वाटा स्वतंत्र असेलरिपोर्टर – आम्ही 60 हजारांना सौदा केलायगजेंद्र – ते मुलासाठी आहेत. माझं कमिशन वेगळं आहे

दुसर्‍या दिवशी 80 हजार देण्याचं आम्ही कबूल केलं. हवी तेवढी मुलं पुरवण्याचं आश्वासन त्यानं दिलं. हा मुलं विक्रीचा व्यवसाय चांगलाच जोरात असल्याचं त्याच्या बोलण्यावरुन स्पष्ट होत होतं.

रिपोर्टर – एकूण किती पैसे लागतील.गजेंद्र – मला 20 हजार कमिशन द्यावे लागतीलरिपोर्टर – तर एकूण 80 हजार द्यावे लागतील, बरोबर ?गजेंद्र – हो… आणि पुढच्या कारवाईसाठी काही द्यारिपोर्टर – त्यासाठी 5 हजार देऊ ?गजेंद्र – तुम्ही वाटेल तेवढे द्या

close