आरोप सिध्द झाले तर प्रभूंवर कारवाई करु -शिवसेनाप्रमुख

April 15, 2012 2:07 PM0 commentsViews: 8

15 एप्रिल

क्लीन चिट ही काय भानगड आहे ? सुब्रमन्यम स्वामी यांनी एक खटला दाखल केला आणि पी चिदंबरम यांना क्लीन चिट मिळाली हा काय प्रकार आहे. सीबीआयचे कोर्ट,अमुक कोर्ट,तमूक कोर्ट मग खरी कोर्ट पाहिजे कशाला असा ठाकरी सवाल बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच व्यगंचित्रकाराच्या दृष्टीकोनातून सांगणे ठरले तर हे सगळे 'नेशन्स ऑफ चीटर्स ' आहे. त्यामुळे शिवसेनेत ही क्लीन चिटची भानगड नाही. सुनील प्रभूंवर जर आरोप सिध्द झाले नक्की कारवाई होईल असंही बाळासाहेबांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे यांच्या बिहार दिनाला विरोध आणि माघार यांचाही बाळासाहेबांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध करणे चुकीचे आहे. आपला त्याला बिल्कुल विरोध नाही. पण त्यापाठीमागे राजकारण करु नये आणि जर तसे होत असेल तर त्याला विरोध होणारच असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आज देशात स्थलांतर करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे पण इथं येऊन आमच्या नोकर्‍यांवर, हक्कांवर गदा येत असेल तर मग ते सहन करण्यापलीकडे आहे असंही बाळासाहेबांनी ठणकावून सांगितले.

close