धावत्या मुंबईला ब्रेक !

April 18, 2012 2:32 PM0 commentsViews: 6

18 एप्रिल

आज लोकलचा वेग मंदावला आणि सगळी मुंबईचं थांबल्याचं चित्र निर्माण झालं. मग ही कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरु झाले. पहिला हात पुढं केला तो बेस्टनं. सायन…कुर्ला…मुलुंडमधून 89 ज्यादा बसेस सोडण्यात आल्या. गरज पडल्यासपुढे 3 दिवसही ज्यादा बसेस चालवणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आलं.

पण हजारो लोक रस्त्यांवर आल्यामुळे.. इस्टर्न एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक जाम झाला. यात बसेस अडकल्या.. आणि प्रवाशांचा रस्त्यावरही खोळंबा झाला. ठाण्यापासून.. सायनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रेल्वेनंही लांब पल्ल्यांच्या गाड्या.. कर्जत आणि कसारापासून. कल्याणपर्यंत सर्व स्टेशनांवर थांबवल्या तसेच मध्यरेल्वेच्या प्रवाशांना माहीम ते चर्चगेटपर्यंत पश्चिम रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली.

मध्य रेल्वेने सुमारे 25 लाख प्रवाशी रोज प्रवास करतात. मुंबईमध्ये मेट्रो, स्कायबस, सीलिंक असे अनेक पर्याय आणण्याबद्दल सरकारी संस्था बोलत असतात. पण लोकल विस्कळीत झाली की मुंबई थांबते, हे अंतिम सत्य आहे. आणि ते बदलण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाही.

close