26/11च्या टॅक्सी बॉम्बस्फोटातील कुटुंब मदतीच्या प्रतिक्षेत

December 16, 2008 7:37 PM0 commentsViews: 4

16 डिसेंबर मुंबईगोविंद तुपेमुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लातअनेकांची कुटुंब उध्वस्त झाली. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् मुंबईत आले असताना त्यांनी सर्व पीडितांना 31 डिसेंबरच्या आत मदत द्या अशा सूचना अधिका-यांना दिल्या होत्या. तरीही ब-याच जणांना आजही सरकारी मदत तर मिळालेलीच नाही. तसंच काही लोक असे आहेत ज्यांना अशा मदतीबद्दल काही माहितीही नाही. असंच एक दुदैर्वी कुटुंब आहे विलेपार्ले येथील टॅक्सीत झालेल्या बॉम्बस्फोटात मृत झालेल्या मो.ओमर शेख या टॅक्सी ड्रायव्हरच.या कुटुंबाकडे कुणाचही लक्ष गेलेलं नाही.मोमिन खान मुंबईतल्या गोवंडी भागात राहतात. 26 नोव्हेंबरला विलेपार्ल्यात टॅक्सीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांनी आपला नवरा गमावला. आणि आता अरबाज, फैजल, अफजल या तीन मुंलांच पोट कसं भरायचं हा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. मोमिनला सरकारी मदत मिळवण्यासाठी कुठे जावं लागतं, कोणती कागपत्रं जमा करावी लागतात. हे माहित नाही. या कुटुंबाची दखल घेण्यासाठी आत्तापर्यंत एकाही पुढा-याला वेळ मिळालेला नाही. कोणी अधिकारीही या कुटुंबाकडे फिरकलेला नाही. पतीच्या मृत्यूचं दु:ख आणि समोर उभा असलेला संकटाचा डोंगर यामुळे मोमिनच्या अश्रूंना खंड नाही.

close