स्वरांचा दहशतवादावर विजय !

April 20, 2012 6:30 PM0 commentsViews: 4

संजय सुरी, लंडन

20 एप्रिल

दहशतवादाला न घाबरता पाकिस्तानातल्या सचल स्टुडिओने इके म्युझिक ग्रुप स्थापन केला. आणि आता याच ग्रुपला लंडन ऑलिम्पिकपूर्व सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.

स्वरांशी दोस्ती करणारा हा निजात अली पाकिस्तानाचा. लाहोरमधिल सचल झाझ बँडग्रुपचा निजात म्युझिक ऍरेंजर. सचल बँडला ऑलिम्पिक पुर्व सोहळ्यासाठी खास लंडनमध्ये निमंत्रित करण्यात आलंय. जगप्रसिध्द डेव्ह ब्रुबेकच्या 1959 सालच्या 'टेक फाईव्ह ' या झाज क्लासिकनं सचल स्टुडिओ प्रसिध्दीत आले. इंटरनेटवर त्याना तुफान लोकप्रियता मिळाली. लंडनपर्यंतचा हा प्रवास स्वप्नवत असला तरी खडतर होता. बंदुकीच्या धाकाला स्वरांच्या ताकदीने उत्तर देत इज्जत मजीद यांनी या सचल स्टुडिओची निर्मिती 2003 मध्ये केली. जगभरात लोकप्रियता मिळत असली तरी या ग्रुपवर बंदीची टांगती तलवार अजुनही कायम आहे.स्वरांचा दहशतवादावरील विजय हीच सचल ग्रुपची खरी ओळख आहे.

close