आज मां,बाबूजींना आनंद झाला असता -बिग बी

April 25, 2012 5:22 PM0 commentsViews: 11

25 एप्रिल

बोफोर्स प्रकरणात मी निर्दोष आहे हे सिध्द होण्यासाठी 25 वर्ष लागली. मी पहिल्यापासून सांगत होतो की, मी निर्दोष आहे, पण दुख एका गोष्टीचेआहे की, मां, बाबूजी यांना आम्ही आज सांगू शकत नाही. ते हयात असताना माझ्यावर केलेल्या आरोपामुळे त्यांना खूप वेदना झाल्यात. आज ते असते तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता अशी भावनात्मक प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली.

आज बोफोर्स प्रकरणी बोफोर्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांना या प्रकरणात विनाकारण फसवण्यात आले होते असा खुलासा माजी पोलीस प्रमुख स्टेन लिंडस्ट्रॉम यांनी केला. या प्रकरणी बिग बींना मिळालेल्या क्लीन चिट मुळे बच्चन कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. आज संध्याकाळी बिग बींनी पत्रकार परिषद घेऊन मन मोकळं केलं. त्या काळात आम्ही जवान होतो. त्यामुळे लढा देऊ शकलो. दररोज पेपरमधून माझ्यावर अनेक आरोप केले जात होते. त्यामुळे बाबूजी दुखी झाले होते त्यांनी मला जवळ घेऊन विचारले होते की, बेटा तू असं काही वाईट काम केलं तर नाही ना ? बाबूजींना दूख झाल्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. मला राजकारण करता येत नाही आताही करत येत नाही. आणि काही दिवसांनी मी राजीनामा दिला. पण तब्बल 25 वर्षानंतर आम्ही निर्दोष होते हे सांगायचे होते तर त्यांनी इतका उशीर का केला. त्यांनी अगोदर स्पष्ट केलं असतं तर खूप बरं झालं असतं. मी पहिल्यापासून हेच सांगत आलो मी निर्दोष आहे. पण दुख एका गोष्टीचे आहे की, मां, बाबूजी यांना आम्ही आज सांगू शकत नाही. ते हयात असताना माझ्यावर केलेल्या आरोपामुळे त्यांना खूप वेदना झाल्या, आज ते असते तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता अशी भावनात्मक प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली.

close