राज यांच्या हस्ते ‘चिंटू’ची गाण्यांची सीडी प्रकाशित

April 25, 2012 5:44 PM0 commentsViews: 34

25 एप्रिल

गेली 21 वर्षं वर्तमानपत्रातून दररोज भेटणारा खोडकर चिंटू 18 मे ला सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर येत आहे. आज पुण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते चिंटूच्या गाण्याच्या सीडी प्रकाशित करण्यात आली. गायक- संगीतकार सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी यानं या सिनेमातली गाणी गायली असून चिंटूच्या भूमिकेत शुभंकर अत्रे आहे. यावेळी राज ठाकरे यांनी सर्व बालकलाकारांचं कौतुक केलं आणि काही आठवणी शेअर केल्या. यावेळी दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, विभावरी देशपांडे, संदीप खरे, सलील कुलकर्णी , चिंटू हास्यचित्रमालिकेचे चारूहास पंडित प्रभाकर वाडेकर हजर होते.

close