4 मेडल्स जिंकून भारतीय बॉक्सर दिल्लीत परतले

December 16, 2008 6:22 PM0 commentsViews: 3

16 डिसेंबर दिल्लीदिल्लीच्या एअरपोर्टवर सकाळी उत्साहाचं वातावरण होतं. कारणही तसंच होतं. मॉस्को येथे झालेल्या बॉक्सिंगच्या वर्ल्ड कप मध्ये 4 मेडल्स जिंकून भारतीय बॉक्सर दिल्लीत परतले. यावेळी सगळेच खूप उत्साहात दिसत होते. पण या आनंदाच कारण मात्र वेगळं होतं.ऑगस्टमध्ये बीजिंग ऑलिम्पिकनंतर पुन्हा एकदा एअरपोर्टवर वातावरण आनंदीत होतं. त्यावेळी भारताने बॉक्सिंगमध्ये ब्राँझ मेडल मिळवल्यामुळे संपूर्ण भारत आनंद साजरा करत होता. पण यावेळी मिळालेला रिझल्ट हा 100 % आहे. मॉस्कोच्या स्पर्धेसाठी गेलेल्या चारही बॉक्सर्सनी ब्राँझ मेडलची कमाई तर केलीच पण बॉक्सिंग जगतात भारताचा दराराही निर्माण केला.

close