अण्णांनी घेतली राज ठाकरेंची भेट

April 26, 2012 2:56 PM0 commentsViews: 26

26 एप्रिल

सक्षम लोकायुक्तासाठी आज जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी गाठीभेटीला सुरुवात केली. आज ठरल्याप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. पण 'मातोश्री'चे दार अण्णांसाठी उघडले नाही. बाळासाहेबांनी अण्णांच्या भेटीला नकार दिला आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णा हजारे यांना पाठिंबा दिला आहे. लोकायुक्ताच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अण्णांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी लोकायुक्तासाठी अण्णा करत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. पण लोकायुक्तासाठी अण्णांनी घेतलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीवर राज यांनी टीका केली. दरोडे रोखण्यासाठी अण्णा दरोडेखोरांनाच भेटतायत अशी टीका केली. अण्णांनी महाराष्ट्रात अधिक लक्ष द्यावं, असा सल्लाही राज यांनी दिला.

राज ठाकरेंची भेट घेण्याआधी अण्णांनी यासंदर्भात आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. लोकायुक्तांबाबत मुख्यमंत्र्यांनी अण्णांना कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही. पण केंद्राने लोकपाल काय कायदा केल्यास त्याच लोकायुक्त सक्षम करण्याची तरतूद नसेल तरी राज्यात लोकायुक्त सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अण्णांनी राज्याचा दौरा करण्यात काहीच गैर नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच लोकपालसोबत लोकायुक्त कायदा मंजूर करण्याची विनंती आपण केंद्राला केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय.

close