कॉपी करताना पकडले म्हणून ‘शोले’गिरी

April 27, 2012 12:13 PM0 commentsViews: 6

27 एप्रिल

'गाववालों ये जो मास्टरजी है ना..,मास्टरजी.. इन्होनें मुझे कॉपी करते समय पकड लिया…अब मेेरा पेपर दो या वरणा एम कमिंग..कमिंग..' असा शोलेचा डायलॉग लावलाय एका तरुणीने. यवतमाळमध्ये परिक्षकांनी कॉपी करताना रंगेहाथ पकडल्यावर एका कॉपीबहाद्दर एका युवतीने चक्क शोले स्टाईल आंदोलन करत पाण्याच्या टाकीवर चढली. प्रश्नपत्रिका सोडवू द्या या मागणीसाठी ही विद्यार्थीनी चक्क पाण्याच्या टाकीवरचं चढली. पुसद इथल्या कोसेटवार विद्यालयातील ही घटना आहे. कृषी पदविका अभ्यासक्रमाची परिक्षा सुरु असताना या कॉपीबह्हादर तरुणीला परिक्षकांनी रंगेहाथ पकडलं. परिक्षकांनी निलंबनाची कारवाई सुरु केल्याने विद्यार्थीनी अजून चवताळली, त्यानंतर सुरु झाला वेगळाच तमाशा. ही विद्यार्थी प्रथम शाळेच्या इमारतीवर चढली, पेपर सोडवू द्या अन्यथा खाली उडी मारते अशी धमकीचं तीने शिक्षकांना दिली. मोठ्या प्रयत्नाने या युवतीला खाली उतरवलं खर, मात्र त्यानंतर तीनं थेट पोलीस स्टेशनकडे धाव घेेतली. तिथल्या पाण्याच्या टाकीवर चढली. दीड तास हा ड्रामा सुरु होता. पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या मदतीने या विद्यार्थीनीला खाली उतरवलं आणि सुटकेचा निश्वास टाकला.या प्रकरणी या विद्यार्थीनीवर गुन्हा दाखल केला.

close