ऑस्कर पुरस्कार परत करणार – भानू अथय्या

April 28, 2012 11:16 AM0 commentsViews: 26

28 एप्रिल

भारताच्या पहिल्या ऑस्करविजेत्या भानू अथय्या यांनी आपल्याला मिळालेला ऑस्कर पुरस्कार परत करणार असल्याचे आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलंय. मला नेहमी अशी भीती वाटते की, भारतामध्ये मानाच्या पुरस्कारांची, वस्तुंचा आदर राखला जात नाही. एक तर त्याकडे दुर्लक्ष होते अथवा त्याची चोरी होते. त्यामुळे ऑस्कर सारखा मानाचा पुरस्कार आपल्याकडे सुरक्षित राहु शकत नाही. म्हणून हा पुरस्कार अमेरिकेतील ऑस्करच्या कार्यालयात सुरक्षतेसाठी पाठवण्यात यावा अशी मागणी अथैया यांनी केली. तसेच भारतात या पुरस्काराची सुरक्षा घेतली जाऊ शकत नाही अशी खतंही अथय्या यांनी व्यक्त केली. भानू अथय्या यांनी 1982 साली 'गांधी' या चित्रपटासाठी उत्कृष्ट वेशभूषाकार म्हणून ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता.

close