मराठमोळा आमिर

April 30, 2012 3:21 PM0 commentsViews: 6

30 एप्रिल

'मी गेल्या दोन वर्षापासून मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.आणि मी माझी पत्नी आणि दोन्ही मुलं आम्ही सगळे जण मराठी शिकत आहोत. थोडफार चुकतो पण शेवटी जमतं. मुलं कंटाळून झोपी जातात पण आम्ही मराठी शिकण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत', अशी कबुली दिली आहे तीही मराठीत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने. तसेच मला मराठी साहित्य वाचायचं आहे. मला ते समजून घ्यायाचं आहे अशी इच्छाही आमिरने व्यक्त केली. महाराष्ट्र दिनानिमित्त आयबीएन लोकमतशी आमिर खानने खास मराठीत बातचीत केली. तसेच उद्याच्या महाराष्ट्रादिनानिमित्त तमाम मराठीजनांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्यात.

आमिरची ही विशेष ग्रेट भेट तुम्ही बघू शकला उद्या म्हणजेच महाराष्ट्र दिनाला..मंगळवारी सकाळी 11, संध्या. 6 आणि रात्री 9.30 वाजता फक्त आयबीएन लोकमतवर

close