पाण्यासाठी राज्य सरकारची कर्नाटककडे ओंजळ !

April 30, 2012 5:41 PM0 commentsViews: 5

30 एप्रिल

राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. ज्सांगली जिल्ह्यातील जत तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जातो. जत तालुक्यातील नागरिकांनी या कायमच्या दुष्काळाला वैतागून एक कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. ठाणे जिल्ह्यातील मोखाड्यातही दुष्काळाने नागरिक त्रस्त आहेत.

'सरकार आम्हाला पाणी देणार नसेल तर आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी', ही संतप्त मागणी जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांची.. प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही…सरकारच्या दरबारी डोकं आपटूनही काही मिळत नाही. त्यामुळेच आता ही संतप्त मागणी होतेय. याच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्रीच कर्नाटक सरकारच्या दारात उभे ठाकले आहे. दुष्काळग्रस्तांना तुम्हीच पाणी द्या अशी मागणी ते कर्नाटक सरकारकडे करताहेत.

जी परिस्थिती सांगली जिल्ह्यात तीच ठाणे जिल्ह्यात आहे. पाण्याच्या थेंबाथेंबासाठी इथं महिलांचा संघर्ष सुरु आहे. बावन्न वर्षाच्या महाराष्ट्रात आज थेंबभर पाण्यासाठी ही वणवण सुरु आहे. पाण्याच्या थेंबासाठीच सीमावर्ती भागातली जनता वैतागून शेजारच्या राज्यात जाण्याचा इशारा देतेय. ही यशवंतरावांच्या नावानं राजकारण करणार्‍या सत्ताधार्‍यांसाठी ही शोकांतिकाच आहे.

close