शिवसेनेचे युवराजही दुष्काळ दौर्‍यावर

May 1, 2012 12:07 PM0 commentsViews: 3

01 मे

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी पाठोपाठ आता शिवसेनेचे युवराज आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेही दुष्काळ दौर्‍यावर निघाले आहे. जव्हार तालुक्यातील काळडोन गावाला त्यांनी भेट दिली. महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांनी मुंबईहून टँकर घेवून गेले होते. गावातल्या मुख्य विहिरीत टँकरव्दारे पाणी सोडण्यात आलं. यानंतर गावकर्‍यांशी संवाद साधला. गावाच्या भेटीवर आलेल्या आदित्य ठाकरेंची 'स्टाईल' पाहुन गावकरी आश्चर्यचकीत झाले. सोबत आणलेला पाण्याचा टँकर पाहुन गावकरी खूष झाले.

close