..तरच अण्णांची भेट – शिवसेनाप्रमुख

May 1, 2012 4:22 PM0 commentsViews: 3

01 एप्रिल

अण्णा हजारे यांच्या टीममधील किरण बेदी, अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया बाजूला झाल्याशिवाय अण्णांशी भेट अशक्य आहे असं स्पष्टीकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं. तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपाचे धनी स्वत:च्या घरात असताना दुसर्‍याच्या भेटी कशा घेतात आम्ही याच कारणामुळे अण्णांची भेट नाकारली असं बाळासाहेबांनी स्पष्ट केलं. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बाळासाहेबांनी अण्णांवर टीका केली. तसेच हल्ली राजकारणात व्यंगचित्र काढण्यासारखे नेतेच नसल्याचा टोलाही बाळासाहेबांनी लगावला.

close