सरकारी उदासीनतेमुळे जलशुद्धीकरण प्रकल्प धूळखात

May 2, 2012 5:18 PM0 commentsViews: 5

माधव सावरगावे, येणेगूर, उमरगा

02 मे

भूकंपग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येणेगूर इथला राज्यातल्या ग्रामीण भागातला पहिलाच जलशुद्धीकरण प्रकल्प गेल्या 14 वर्षांपासून धूळ खात पडला आहे. त्याकडे कुणाचंही लक्ष नाही. 1995 साली युती सरकारने तीन गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी इथं हा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला. त्यासाठी त्यावेळी साडेसात कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याची आज ही अशी अवस्था आहे. तब्बल 14 वर्षांपासून हा प्रकल्प असा धूळखात पडला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा हा प्रकल्प चालवायचा कुणी? जवळच्या बेनितुरा प्रकल्पात पाणी असूनसुद्धा नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. राज्यातल्या ग्रामीण भागात जलशुद्धीकरणाचा उभा राहिलेला हा पहिलाच प्रकल्प..पण केवळ राजकारण्यांच्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्याची ही दयनीय अवस्था झाली.

close