कसाब पाकिस्तानीच – एफबीआय

December 17, 2008 7:02 AM0 commentsViews:

17 डिसेंबरमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला अतिरेकी अजमल कसाब हा पाकिस्तानचाच नागरिक असल्याची एफबीआय या अमेरिकेच्या तपास संस्थेची खात्री पटलीय. या हल्ल्याचं नियोजन आणि कार्यवाही लष्कर-ए-तोयबानचं केल्याचंही एफबीआयनं स्पष्ट केलंय. राजकीय सूत्रांच्या माध्यमातून एफबीआयनं तपासाचा तपशील दिलाय. एफबीयआनं कसाबची 9 तास चौकशी केली. त्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. भारतीय तपास संस्थांशी एफबीआयचे निष्कर्ष मिळते-जुळते आहेत. कसाबच्या वडिलांनी यापूर्वीच कसाब हा आपला मुलगा असल्याचं कबूल केलं होतं. तसंच कसाबनं सहा महिन्यांपूर्वी आपल्या आई-वडिलांची भेट घेतली होती, असं पाकिस्तानातल्या जिओ टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशननंतर स्पष्ट झालं होतं. पाकिस्ताननं मात्र कसाब पाकिस्तानी नागरिक असल्याचं वारंवार नाकारलं होतं. मात्र आता एफबीआयनेही कसाब पाकिस्तानी असल्याचं स्पष्ट केल्याने भारताची भूमिका अधिक बळकट झाल्याचं मानलं जात आहे.

close