सचिन सरांचा तास

May 3, 2012 4:15 PM0 commentsViews: 3

03 मे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांने आज पुण्यातील काही युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केलं. यश मिळेपर्यंत प्रयत्न करायला शिका असा सल्ला त्याने या युवा खेळाडूंना दिला. या कार्यक्रमात खेळाडुंनी विचारलेल्या प्रश्नांना सचिनने अगदी दिलखुलास उत्तरं दिली. दुखापतीमधून कसं सावरायचं, टीम मिटिंगचं महत्व काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सचिनने खेळाडूंना दिली. अपयश आणि यशांमधला फरक आणि त्यापासून प्रेरणा कशी घ्यायची हे ही सचिन सरांनी समजावून दिलं.

close