‘प्यावं लागतंय चिखलाचं पाणी’

May 3, 2012 5:23 PM0 commentsViews: 4

03 मे

नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरजवळच्या काळमुस्ते गावातल्या लोकांवर चिखलाचं पाणी पिण्याची वेळ आली आहे. या गावकर्‍यांच्या नावावर पंचायत समितीत टँकर मंजूर आहे. पण काळमुस्ते गावात यंदाच काय, या आधी कधीही टँकर आला नसल्याची गावकर्‍यांची तक्रार आहे. इथल्या पडक्या विहिरीत उतरून बायका पाणी भरतात. इथली जनावरंही हेच चिखलाचं पाणी पितात आणि माणसंही. खर तर त्र्यंबकेश्वर हा नाशिक जिल्ह्यातला सर्वात जास्त पाऊस पडणारा तालुका. पण पाणी जिरवण्याच्या आणि साठवण्याच्या बहुतांश योजना फक्त कागदावरच आहेत. त्यामुळे सध्या त्र्यंबकच्या बर्‍याच गावांमध्ये पाण्याची टंचाई भासतेय.

close