दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करा – उध्दव

May 5, 2012 11:17 AM0 commentsViews: 55

05 मे

राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याचा प्रश्न आहेच पण पाण्याअभावी शेतकर्‍यांनी पिकंही करपली आहे त्यामुळे शेतकर्‍यांचं संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केली. उध्दव ठाकरे सध्या दुष्काळी भागाच्या दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी उस्मानाबादच्चा खेड गावाला भेट दिली. राज्यात दुष्काळी भागाचा राज्यसरकारने दौरा करावा त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. पाणी, चारा दुष्काळी भागात तात्काळ देण्यात यावा नुसत्या बैठका घेऊन फायदा नाही असा सल्लावजा टोला उध्दव यांनी लगावला. तसेच मनसेनं दुष्काळी भागाला मदत सुरु केली आहे याबद्दल उध्दव यांनी मी बोलून दाखवत नाही करुन दाखवतो असा टोला लगावला.

close