जम्मू – काश्मीरमध्ये 63 टक्के मतदान

December 17, 2008 7:20 AM0 commentsViews: 2

17 डिसेंबर, जम्मू आणि काश्मीरजम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पार पडलेल्या सहाव्या टप्प्यासाठी 63 टक्के मतदान झालं. दोडा जिल्ह्यातल्या भदरवाह मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद निवडणूक लढवत आहेत. या संपूर्ण प्रदेशात अतिरेक्यांचा मोठा वावर आहे. त्यामुळे मतदानासाठी दोडा-किश्तवार या पर्वतमय भागात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. निमलष्करी दलाच्या 160 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. दुर्गम भागात मोबाईल सुरक्षा पथक सज्ज ठेवण्यात आली होती.

close