सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचवणार – अमृतेश

May 4, 2012 12:34 PM0 commentsViews: 102

4 मे

युपीएससी (UPSC) अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालात महाराष्ट्रातील 80 विद्यार्थ्यांनी पास होऊन महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. यामध्ये अमृतेश औरंगाबादकर हा देशात 10 वा, तर राज्यात पहिला आला आहे. नितिका पवार देशात 18 वी, रवींद्र बिनवडे देशात 30 वा आला आहे.तर देशात शेना अग्रवाल ही पहिली आली आहेत तर रुक्मिणी रियार दुसरी आणि प्रिंस धवन दुसरा आला आहे.

अमृतेश हा पुण्याचा विद्यार्थी आहे. त्याचं ग्रॅज्युऐशन फर्ग्युसन कॉलेजमधून झालंय. पदवीला अर्थशास्त्र हा त्याचा विषय होता. यूपीएससीचा अभ्यास करण्याबरोबरच त्यानं आपले छंदही जोपासले. आयबीएन लोकमतशी बोलताना अमृतेश म्हणाला की, युपीएससीची परीक्षा अवघड होती. पण, मी कधी असा विचार केला नाही की, आपल्याला अमुअमुक रँकिंग गाठायचे आहे, इतके मार्क मिळाले पाहिजे असं काही विचार केला नाही. मी फक्त अभ्यास करत गेलो. पदवीच्या तिसर्‍या वर्षी असताना मी युपीएससी परीक्षा देण्याचं ठरवलं होतं. युपीएससीची परीक्षा देण्यासाठी वडिलांकडून प्रेरणा मिळाली त्यांनी अनेक वर्ष सरकारी नोकरी केली आणि माझी ताई तीने वेळोवेळी पाठिंबा दिला त्यामुळे मी हे यश मिळवू शकलो आता मिळालेल्या या संधीचे सोनं करत सरकारी योजना जनतेपर्यंत पोचवण्याची इच्छा अमृतेशनं व्यक्त केली.

close