तिबेट आंदोलनातून दलाई लामा बाहेर

December 17, 2008 8:18 AM0 commentsViews: 21

17 डिसेंबरतिबेट आंदोलनातून आपण बाहेर पडत असल्याची घोषणा दलाईलामा यांनी केली आहे. आंदोलनातून आपण निवृत्त होत असून आपले राजकीय सल्लागार आता या तिबेट आंदोलनाचं नेतृत्व करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. गेली 58 वर्ष त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. दलाई लामांच्या नेतृत्त्वामुळं तिबेटमधलं हे लोक आंदोलन जगभर पोहोचलं.तिबेटवर राज्य करताना चीनच्या अनेक धोरणांविरुद्ध दलाई लामांनी आवाज उठवला होता. चीनकडून होणार्‍या मानवी हक्कांच्या पायामल्लीविरुद्ध त्यांनी आंदोलन छेडलं. या आंदोलनाचा परिणाम म्हणून त्यांच्याविरुद्ध चीन सरकारनं आघाडी उघडली. यानंतर चीनमधून परागंदा होत ते भारताच्या आश्रयाला आले. मात्र तेथूनही चीनविरुद्धचा आपला संघर्ष चालूच ठेवला. आपल्या शांत स्वभावाने आणि मानवी अधिकारांच्या ठाम आग्रहाने संपूर्ण जगात त्यांनी आपली ओळख बनवली. मात्र आता त्यांच्या निवृत्तीनंतर तिबेटी आंदोलनाचं काय होणार ? याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

close