जखमी हत्तीणीची मृत्यूशी झुंज

May 9, 2012 5:21 PM0 commentsViews: 5

09 मे

पिंपरी चिंचवडमध्ये एका हत्तीणीला तिचा मालक, माहुत जखमी अवस्थेत सोडून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरी प्राधिकरणतील गणेश तलावाच्या परिसरातील गटारात ही हत्तीण मृत्यूशी झुंज देतेय. या हत्तीणीच्या मागील पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे ती मागील अनेक महिन्यापासून चालू शकत नव्हती. तिच्यावर उपचार करूनही ती बरी होत नसल्यामुळेच अखेर तीच्या मालकाने तिला याच अवस्थेत सोडून पळ काढला. ही हत्तीण इथल्या नागरिकांच्या ओळखीची असल्याने तीला वाचवण्यासाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे. पण वन अधिकार्‍यांना कळूनही अद्यापही त्यांनी याबाबत अजून कोणतीही उपाययोजना केलेली नाही. जन्मभर तिच्या जीवावर आपला उदारनिर्वाह करून दुखात तीला सोडून जाणार्‍या मालकाविरुध्द संताप व्यक्त केला जात आहे.

close