पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला

May 12, 2012 10:54 AM0 commentsViews: 2

12 मे

एनसीईआरटी (NCERT) च्या पुस्तकात छापून आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्रावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. संसदेतल्या वादाचे पडसाद आज पुण्यातही उमटले. रिपब्लिकन पँथर्स या संघटनेनं डॉ सुहास पळशीकर यांच्या पुणे विद्यापीठातल्या कार्यालयावर हल्ला केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एनसीईआरटी (NCERT) च्या पुस्तकातल्या व्यंगचित्रावरुन संसदेत असा गदारोळ झाला. त्यानंतर त्याचे आज पुण्यात पडसाद उमटले. डॉ. सुहास पळशीकरांच्या पुणे विद्यापीठातल्या राज्यशास्त्र विभागाच्या कार्यालयाची तोडफोड रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यांनी या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली. अशाप्रकारे हल्ला करायला प्रोत्साहन देणार्‍या प्रवृत्तीला खरी समज देण्याची गरज आहे, असं स्पष्ट मत सुहास पळशीकर यांनी हल्ल्यानंतर व्यक्त केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंगचित्राचे राजकारणच यातून होताना दिसतोय. तर त्यांच्या नावानं राजकारण करणारे स्टंटबाजी करताहेत का असा सवालही विचारला जातोय.

close