लाचखोर पोलिसी खाक्या उघड

May 15, 2012 6:14 PM0 commentsViews: 9

दीप्ती राऊत, नाशिक

15 मे

नाशिकमध्ये सुरू केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमुळे बर्‍याच सराईत गुन्हेगारांना चपराक बसलीय. पण पोलीस आयुक्तांच्या कानामागे वेगळंच घडतंय. भंगार बाजारात झालेल्या कोंबिंग ऑपरेशनचं हे एक उदाहरण. यावेळी चोरीचा माल म्हणून शाईन मेटल या कारखान्यातून 34 लाखांचा माल जप्त करण्यात आला. तो माल अधिकृत असल्याच्या पावत्या मालकाने दाखवल्या तर ती फाईलच पोलीस अधिकार्‍यांनी गायब केली. आणि हा माल परत घेण्यासाठी पोलिसांनी चक्क 2 लाखांची लाच मागितल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे गहाळ झालेली फाईल स्वत: घेऊन जाताना अंबडचे पोलीस अधिकारी या कारखान्याच्या कॅमेर्‍यात कैद झाले.

फक्त अंबडच नाही तर भद्रकाली पोलीस स्टेशनबद्दलही अशाच तक्रारी येत आहे. हनीफ शेख काँग्रेसचे कार्यकर्ते. त्यांच्या विरोधातली प्रतिबंधात्मक कारवाई रोखण्यासाठी पोलिसांनी 4 हजार रुपये मागितल्याची त्यांची तक्रार आहे. त्याचंही रेकॉर्डिंगही झालंय. शहरातल्या गुन्हेगारांचा बंदोबस्त पोलीस आयुक्तांनी केला. पण आता त्यांच्यापुढे आहवान आहे ते त्यांच्याच यंत्रणेतल्या सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त करण्याचं. त्यांच्यावर कारवाई करताना पोलीस आयुक्त फक्त लहान माशांपर्यंत मर्यादित राहाणात की मोठ्या माशांपर्यंत पोहोचणार हेच पहाणं महत्त्वाचं आहे..

भद्रकाली पोलिस स्टेशनमधल्या पैसे मागणार्‍या पोलीस कॉन्सटेबलवर कारवाई झाली. पण तो ज्याच्यासाठी पैसे मागत होता त्या वरिष्ठ अधिकार्‍यापर्यंत कुणी पोहोचलं नाही. तीच बाब अंबडचीही. अंबडमध्येही अधिकार्‍यांच्या वतीनं पैशाची मागणी करणार्‍या कॉन्स्टेबलवर कारवाई होईलही, पण त्यामागच्या अधिकार्‍यांचं काय ?

close