सचिनची सामाजिक बांधिलकी

December 17, 2008 9:32 AM0 commentsViews: 10

17 डिसेंबर, मुंबईक्रिकेटमध्ये खिलाडू वृत्तीसाठी सचिन तेंडुलकर ओळखला जातो. खासगी आयुष्यातही त्याने असाच आदर्श मुंबईकरांसाठी घालून दिलाय. सचिनने मुंबईत वांद्रे भागात दोराब व्हिला हा बंगला विकत घेतला होता आणि आता काही दिवसांपूर्वीच त्याने तिथं बांधकामही सुरू केलं आहे. पण बांधकाम सुरू करण्यापूर्वी सचिनने चक्क त्याच्या नव्या शेजार्‍यांची परवानगी मागितली आहे. बांधकामा दरम्यान पायलिंग मशिनचा मोठा आवाज होणार. त्यासाठी शेजार्‍यांना पत्र लिहून सचिनने दिलगिरी व्यक्त केली आहे. बांधकाम रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवणार नाही अशी हमी शेजार्‍यांना या पत्रातून सचिनने दिलीय. त्याच्या शेजार्‍यांनीही मग अर्थातच सचिनच्या या वृत्तीचं कौतुक केलं आहे.

close