रेखा यांनी घेतली खासदारकीची शपथ

May 15, 2012 11:38 AM0 commentsViews: 11

15 मे

सुप्रसिध्दी अभिनेत्री रेखा यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नामनियुक्त सदस्य म्हणून रेखा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांची नियुक्ती केली होती. ऐंशीच्या दशकात अनेक सिनेमांमधून रेखाने आपल्या सदाबहार अभिनयानं रसिकांची मनं जिंकली आणि अनेक पुरस्कारही पटकावले. सचिन तेंडुलकर उद्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेणार आहे. दोघांचीही नियुक्ती 27 एप्रिलपासून करण्यात आली होती.

close